भारताबरोबरील तणाव कमी करणार : कुरेशी 

पीटीआय
गुरुवार, 7 मार्च 2019

इस्लामाबाद (पीटीआय) : भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान त्यांच्या उच्चायुक्तांना पुन्हा दिल्लीला पाठवणार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी बुधवार स्पष्ट केले. भारताबरोबरील तणावाचे वातावरण कमी करण्यास पाकिस्तान तयार आहे. 

इस्लामाबाद (पीटीआय) : भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान त्यांच्या उच्चायुक्तांना पुन्हा दिल्लीला पाठवणार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी बुधवार स्पष्ट केले. भारताबरोबरील तणावाचे वातावरण कमी करण्यास पाकिस्तान तयार आहे. 

कुरेशी म्हणाले, "अमेरिका, चीन और रशियासारख्या देशांकडून सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांतून दोन्ही देशांमधील तणाव दूर होत असून सर्व वाद संपविण्याची व शांततेची कास धरण्याची ही योग्य वेळ आहे. दोन्ही देशांमधील शांततेला मारक ठरणारे सर्व मुद्दे निकाली काढण्याची पाकिस्तानला इच्छा आहे. भारत व पाकिस्तानमधील तणाव निवळतोय हे सकारात्मक चिन्ह आहे.'' यासाठी पाकिस्तान राजनैतिक पातळीवरूनही प्रयत्न सुरू ठेवणार असून पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांना परत भारतात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. 

पुलवामा हल्ल्यानंतर 14 फेब्रुवारीनंतर भारताने पाकिस्तानमधील आपले उच्चायुक्त अजय बिसारिया यांना तातडीने परत भारतात बोलाविले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारतातील त्यांचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांना पाकिस्तानला बोलावून घेतले होते. 

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकने खासगी पातळीवर केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. चीन, रशिया, तुर्कस्तान व संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. "कर्तारपूर कॉरिडॉर'संबंधी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे शिष्टमंडळ लवकरच भारतात जाणार आहे. 
शाह मेहमूद कुरेशी, परराष्ट्र मंत्री, पाकिस्तान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Qureshi said to reduce tensions with India