VIDEO : 'I Hate Indians' म्हणत चार भारतीय वंशाच्या महिलांवर हल्ला; ठार मारण्याची दिली धमकी

अमेरिकेत (America) भारतीय वंशाच्या महिलांवर वांशिक हल्ल्याचं लाजिरवाणं प्रकरण समोर आलंय.
Mexican Women
Mexican Womenesakal
Summary

अमेरिकेत (America) भारतीय वंशाच्या महिलांवर वांशिक हल्ल्याचं लाजिरवाणं प्रकरण समोर आलंय.

अमेरिकेत (America) भारतीय वंशाच्या महिलांवर वांशिक हल्ल्याचं लाजिरवाणं प्रकरण समोर आलंय. अमेरिकन-मेक्सिन महिलेनं (Mexican Women) टेक्सासच्या (Texas) रस्त्यावर फिरणाऱ्या 4 भारतीय महिलांशी गैरवर्तन तर केलंच; पण मारहाण केल्यानंतर त्यांना बंदूक दाखवून गोळ्या घालण्याची धमकीही दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मेक्सिकन पोलिसांनी (Mexican Police) आरोपी महिलेला अटक केलीय.

तुम्ही अमेरिकेत का आलात?

बुधवारी रात्री ही घटना घडलीय. टेक्सासमधील डॅलस येथील हॉटेलमध्ये जेवण करून चार भारतीय वंशाच्या महिला पार्किंगच्या दिशेनं चालल्या होत्या. तेवढ्यात अचानक एक मेक्सिकन-अमेरिकन वंशाची महिला तिथं आली. त्या महिलेनं भारतीय महिलांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. ती महिला म्हणाली, 'मला भारतीयांचा तिरस्कार आहे. सर्व भारतीय चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत येतात. ती भारतीय वंशाच्या महिलांवर अत्याचार करत राहिली. आरोपी महिलेनं सांगितलं की, तिचा जन्म अमेरिकेत झाला; पण ती जिथं जाते तिथं तिला भारतीयच दिसतात. जर भारतात जीवन चांगलं आहे, तर तुम्ही लोक इथं का आलात? असा सवाल करत तिनं मारहाण करण्यास सुरुवात केली.

Mexican Women
Asaduddin Owaisi : भाजप नेत्याला अटक होताच ओवैसींनी मुस्लिम समाजाला केलं 'हे' आवाहन

शिवीगाळ करत महिलांना मारहाण

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत एका व्यक्तीनं लिहिलंय, 'माझी आई आणि तिच्या 3 मैत्रिणी डॅलसमध्ये जेवायला गेल्या होत्या. त्या पार्किंगमध्ये परतत असताना एक मेक्सिकन-अमेरिकन महिला तिथं आली. तिनं चौघींवर टीका करत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. माझी आई तिला असं न बोलण्याचं आवाहन करत राहिली. तिचं गैरवर्तन वाढत असल्याचं पाहून आईनं तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. हे पाहून महिलेला राग आला आणि तिनं आई आणि तिच्या मैत्रिणींना मारहाण करण्यास सुरुवात केली.

Mexican Women
Al Qaeda : दहशतवादी कट उधळला? आसाममध्ये अल कायदाशी संबंधित 34 जणांना अटक

आरोपी महिलेला अटक

आरोपी मेक्सिकन-अमेरिकन महिलेचं नाव एस्मेराल्डा अप्टन (Esmeralda Upton) असं असून ती टेक्सासमधील प्लानो येथील रहिवासी आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टेक्सासमधील प्लानो शहरातील पोलिसांनी गुरुवारी दुपारी एस्मेराल्डा या महिलेला अटक केलीय. तिच्यावर वांशिक हल्ला आणि धमकी देण्याचं कलम लावण्यात आलंय. एस्मेराल्डाला 10 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आलाय. वास्तविक, प्लानो आणि डॅलसमधील अंतर फक्त 31 किलोमीटर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com