‘मी भारतीयांचा तिरस्कार करते’- एस्मराल्डा अपटॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

racism-with-indian-americans-in-texas-mexican-american-woman-arrest-mexican-police

‘मी भारतीयांचा तिरस्कार करते’- एस्मराल्डा अपटॉन

वॉशिंग्टन : अमेरिकेत भारतीय वंशांच्या चार महिलांना वंशवादाला सामोरे जावे लागले. टेक्सासमध्ये बुधवारी (ता.२४) एका मेक्सिकन -अमेरिकन महिलेने ‘मी भारतीयांचा तिरस्कार करते, तुम्ही परत भारतात जा,’ असे म्हणत भारतीय वंशाचा महिलांना धक्काबुक्की केली. संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेचे नाव एस्मराल्डा अपटॉन असे आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. टेक्सासमधील डल्लास येथील वाहनतळाच्या परिसरात अपटॉन ही भारतीय वंशाच्या चार महिलांवर टीका करताना दिसत आहे. ‘‘मी भारतीयांची तिरस्कार करते. चांगले जीवन जगता यावे म्हणून हे भारतीय अमेरिकेत येतात. तुम्ही भारतीय सर्वत्र तुम्ही आहात.

मी जेथे-जेथे जाते, तेथे तुम्ही भारतीय सर्वत्र दिसता. जर भारताततील आयुष्य खूप चांगले आहे, तर तुम्ही येथे का आहात. तुम्ही परत भारतात जा. तुम्ही लोक या देशाचा नाश करीत आहात,’’ असे ओरडून सांगत तिने शिविगाळ व दोघींना धक्काबुक्की केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांना या घटनेचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने लिहिले आहे, की माझी आई आणि तिच्या तीन मैत्रिणी रात्री जेवणासाठी डल्लास येथे गेल्यावर हा अनुभव आला. या महिलेच्या रोषाला सामोरी जात माझी आई तिला वांशिक शिविगाळ करू नका, अशी विनंती करीत होती. अमेरिकेत जन्म झाल्याचे सांगणाऱ्या या मेक्सिकन महिलेने आई व तिच्या अन्य मैत्रिणींना मारहाणही केली. ‘‘ही घटना खूप भीतीदायक आहे.

या महिलेकडे बंदूक होती आणि भारतीय-अमेरिकन महिलांचे इंग्रजी बोलताची विशिष्ट पद्धत पाहून ती त्यांच्यावर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत होती. या दुष्ट महिलेवर द्वेषाच्या गुन्ह्यासाठी खटला भरण्याची गरज आहे,’’ असे रिमा रसूल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. या वंशवादाच्या गुन्ह्याचा तपास प्लॅनो पोलिस विभागाकडून करण्यात येत आहे.

हल्ल्याचा निषेध

दक्षिण आशियाई अमेरिकी समुदायाशी संबंध असलेल्या उत्तर टेक्सासमधील गटांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांसाठी उत्तर टेक्सास हे अतिशय आनंददायी आणि सुरक्षित ठिकाण आहे, असे ‘इंडिया असोसिएशन ऑफ नॉर्थ टेक्सास’ या संघटनेचे अध्यक्ष उरमीत जुनेजा यांनी म्हटले आहे.

Web Title: Racism With Indian Americans In Texas Mexican American Woman Arrest Mexican Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..