...तर भाजप 2019 मध्ये जिंकू शकणार नाही : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

लहान-मोठ्या व्यावसायिकांचे नोटबंदीनंतर नुकसान झाले. तसेच जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेत गोंधळ उडाला. आम्ही ही परिस्थिती बदलू इच्छितो, असेही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले.  

लंडन : लंडनच्या इंटरनॅशल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रॅटजिक स्टडीजमध्ये बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश व बिहारमध्ये समाजवादी पक्ष व बहुजन समाजवादी पक्षात आघाडी झाल्यास 2019 मध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही, असे विधान केले.

उत्तर प्रदेश व बिहारमध्ये आघडी झाली तर, भाजपला 120 जागांवर फटका बसेल व त्यांच्या जागा कमी होतील, त्यामुळे भाजप 2019 साली लोकसभा निवडणूक जिंकू शकणार नाहीत, असेही ते यावेळी म्हणाले. जशी अरब राष्ट्रांमध्ये ब्रदरहूडची विचारसरणी त्याप्रमाणेच आरएसएस भारतात पसरत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताचा मूळ स्वभाव बदलत आहे. 

लहान-मोठ्या व्यावसायिकांचे नोटबंदीनंतर नुकसान झाले. तसेच जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेत गोंधळ उडाला. आम्ही ही परिस्थिती बदलू इच्छितो, असेही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi talk about 2019 elections in london