चालकाविना रेल्वे धावली तब्बल 90 किलोमीटर 

पीटीआय
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

सिडनी : लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या 268 बोगींसह एका रेल्वे गाडीने चालकाविना तब्बल 90 किलोमीटर प्रवास केल्याची घटना ऑस्ट्रेलियात घडली. चालकाविना धावणारी ही मालगाडी थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यात यश आले नाही. अखेर सुमारे तासाभराचा प्रवास केल्यानंतर रेल्वेरुळांवर अडथळे उभे करून ही मालगाडी रुळांवरून खाली घसरविण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

ऑस्ट्रेलियातील दुर्गम भागातून लोह खनिजाची वाहतूक करण्यासाठी मालवाहू रेल्वेगाड्याचा वापर केला जातो. बीएचपी या खाण उद्योगातील आघाडीच्या कंपनीच्या मालकीच्या या रेल्वेगाडीला लोह खनिजाने भरलेल्या 268 मालवाहू बोगी जोडण्यात आल्या होता. गाडीची तपासणी करण्यासाठी रेल्वेचा चालक आपल्या केबिनमधून खाली उतरला आणि त्यानंतर तासाभराच्या थराराला सुरवात झाली. 

चालकाविना धावणारी ही गाडी 110 प्रतितास वेगाने धावू लागल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. कारण हा रेल्वेमार्ग मोठ्या शहरातून जातो. त्यामुळे चालकाविना धावणारी गाडी थांबविण्यासाठी सर्व पर्याय पडताळून पाहण्यात आले. 

मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर संभाव्य अपघात टाळण्यासाठी रेल्वे रुळांवर अडथळे उभे करण्यात आले. या अडथळ्यांमुळे मालगाडी रेल्वे रुळांवरून खाली घसरली. त्यात सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील रेल्वे रुळांसह अनेक बोगींचेही नुकसान झाले. मात्र, रेल्वेमार्गावरील पोर्ट हेडलॅंड शहरात प्रवेश करण्यापूर्वीच गाडी थांबविण्यात यश आले. 

लोह पुरवठ्यावर परिणाम नाही 

या अपघाताची चौकशी करण्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, यामुळे लोह खनिजाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. जगातील सर्वांत मोठ्या लोह खनिज उत्पादक देशांमध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Rail Runs 90 km without Driver