esakal | पावसामध्ये आहे एका डोंगराला दुसरीकडे हलवण्याची शक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामध्ये आहे एका डोंगराला दुसरीकडे हलवण्याची शक्ती

ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीच्या एका नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात पावसाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.  पावसामध्ये मोठे डोंगर एका जागेवरून दुसरीकडे हलवण्याची शक्ती असते असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.

पावसामध्ये आहे एका डोंगराला दुसरीकडे हलवण्याची शक्ती

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई: ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीच्या एका नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात पावसाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.  पावसामध्ये मोठे डोंगर एका जागेवरून दुसरीकडे हलवण्याची शक्ती असते असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. या अभ्यासाचा केंद्रबिंदू भूतान आणि नेपाळ होता. भूगर्भशास्त्रज्ञांनी या भागातील एक अशी जागा निवडली जी जमिनीची धूप आणि त्यावर अभ्यास करण्यासाठी उत्तम अशीच होती. 

अभ्यासकांचा असा विश्वास आहे की, पावसाच्या पाण्याने डोंगरांवरील उतारावर अधिक प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे. द डेली एक्सप्रेसने त्यांच्या एका लेखामध्ये असं नमूद केलं आहे की, हिमालय भागात पावसामुळे सातत्याने जमिनीची जी धूप होत आहे त्यामुळे जगातील सर्वात उंच पर्वतरांगातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाढून तिथल्या जलविद्युत प्रकल्पांना धोका निर्माण होऊ शकतो. मात्र या अभ्यासामुळे पुढे येणाऱ्या गोष्टी आणि निष्कर्षांमुळे हिमालयातील भूमीच्या वापर, व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी होईल. सोबतच येत्या काळात उद्भवणाऱ्या धोक्याचा अंदाज बांधून पुढील धोके कमी करण्यावर भर देता येईल. 

तुम्हाला काय वाटतं, पावसामुळे आणखी काय होऊ शकतं ? 

ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीमार्फत एक महत्त्वपूर्ण अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये तिथल्या पर्वतांवरील आणि मोठमोठाल्या लँडस्केपच्या पावसामुळे होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. ज्यावरून आपल्याला मोठी शिखरे आणि दऱ्या कशा बनतात याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

अधिक वाचा-  दिवाळीत ठाण्याहून सुटणाऱ्या STच्या फेऱ्या कमी, भाऊबीजेला अतिरिक्त बसेस

यामध्ये मातीच्या कणांमधील कॉस्मिक घड्याळाचा वापर करून नदीखालच्या खडकांची किती वेळात धूप होते याचा अभ्यास केला गेला. यावरून पावसामुळे खरंच किती प्रमाणात डोंगरांची धूप होत आहे याची माहिती मिळू शकते. याबाबत माहिती देताना डॉक्टर ऍडम असंही म्हणालेत की, जेव्हा पृथ्वी बाहेरील कॉस्मिक पार्टीकल पृथ्वीवर येतात तेव्हा ते डोंगर उतारावरील मातीच्या कणांना आदळून त्यांना नदीच्या पात्रात ढकलण्याचे काम करतात. या अभ्यासातून डॉक्टर ऍडम यांना मातीच्या कणांची धूप होऊन त्यांचं मोठ्या मैदानांमध्ये रूपांतर झाल्याचं उमगलं. 

याबाबत बोलताना डॉक्टर ऍडम असंही म्हणालेत की, याबाबत आपण असाही अंदाज लावू शकतो की जास्त पावसामुळे नद्यांमधील पाण्याने त्याखालील खडक अधिक वेगाने कापले काऊ शकतात आणि म्हणूनच हा शोध अतिशय रोमांचक असल्याचंही ते म्हणालेत. 

अधिक वाचा-  कोरोनाचा रावण मारला जात नाही, संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना टोला

हा अभ्यास मुख्यत्वे हिमालय डोंगररांगांना केंद्रबिंदू ठेऊन करण्यात आलेला. यातून असा निष्कर्ष निघतो की पावसामध्ये एक डोंगर दुसरीकडे हलवण्याची शक्ती असते. दरम्यान, यातील अभ्यासकांनी असं म्हणलं आहे की, यावेळी समोर आलेल्या गोष्टींमुळे सदर भागातील जागेच्या व्यवस्थापनासाठी आणि  पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीसाठी याचा मोठा उपयोग होऊ शकतो.

Rainfall power move large mountains from one place another University of Bristol study