कोणत्याच वेदना न होणारी 'ही' जगातील पहिली महिला

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 एप्रिल 2019

ग्लासगो (स्कॉटलंड) - अव्हेंजर्स सिरिजचे अनेकजण चाहते असतील. एप्रिलमध्ये अव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट देखील येतो आहे. या म्युटंट्सबद्दल सगळ्यांचा उत्सुकता असते. पण असे म्युटंट्स खरंच अस्तित्वात आले तर..? जगात अशा दोन व्यक्ति असून, त्यातिल एक स्कॉटलंटमधील 71 वर्षांची महिला आहे. जो कॅमेरॉन असे या महिलेचे नाव असून, रेअर अशा जेनेटिक बदलांमुंळे या महिलेला वेदनाच होत नाही.

आपल्या या स्थितीबद्दल वयाच्या 65 व्या वर्षी आपल्याला समजल्याचे कॅमोरॉन यांनी म्हटले आहे. याबद्दल मिळालेली माहिती अशा की कॅमेरॉन यांच्यावर मोठी शस्त्रक्रीया करण्यात आली. परंतु, त्यांना त्यानंतर कोणतीच वेदना जाणवत नव्हती. त्यामुळे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना वेदना विशेषज्ञांकडे (pain geneticists) तपासणीसाठी पाठविले. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्याच्यात विशेष असे जेनेटिक बदल झाले असून यामुळे त्यांना वेदना होत नसल्याचे समोर आले आहे.

याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर देखील झाला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. एक इंग्रजी वृत्तापत्राशी बोलताना कॅमेरॉन म्हणाल्या, ''मला आधी हे लक्षातच आले नाही की मला वेदना होत नाही. शिवाय जेव्हा आपल्याला पेनकिलर गोळ्या घ्यायची वेळे येते तेव्हा आपण त्यांच्या विचार करतो.. पण जर त्या घ्याव्या लागत नसतील तर आपण त्याबद्दल विचार करत नाही.. त्यामुळे माझे याकडे लक्ष गेले नाही'.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rare Genetic Mutation Makes Woman Virtually Immune to Pain