
ऑक्सफर्ड स्टुडंट युनियनची अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळालेली भारतीय विद्यार्थिनी रश्मी सामंत हिने आज तिच्या पदाचा राजीनामा दिला आहे. रश्मीने सोशल मीडिया पोस्टमध्ये आक्षेपार्ह विधाने केली होती.
लंडन - ऑक्सफर्ड स्टुडंट युनियनची अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळालेली भारतीय विद्यार्थिनी रश्मी सामंत हिने आज तिच्या पदाचा राजीनामा दिला आहे. रश्मीने सोशल मीडिया पोस्टमध्ये आक्षेपार्ह विधाने केली होती. यामुळे तिच्यावर वर्णद्वेष आणि असंवेदनशीलतेचा ठपका ठेवण्यात आला होता. हीच वक्तव्ये तिच्या अंगलट आली. रश्मीने २०१७ मध्ये बर्लिनमधील जर्मनीतील वंशच्छेद झालेल्या स्मारकास भेट दिली होती, त्या अनुषंगाने तिने एक पोस्ट केली होती.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तिच्यावरून देखील वाद झाला होता. मलेशियाला भेट दिली असताना तिने या संदर्भातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, त्याला चिंग चँग असे कॅप्शन दिल्याने अनेक चिनी विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. रश्मीने प्रचारादरम्यान महिला आणि लिंगबदल केलेल्या महिला यांच्यात भेद करणारी एक पोस्ट केली होती, त्याला एलजीबीटीक्यू समुदायाने आक्षेप घेत तिच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
नोबेल विजेत्या मलाला युसुफझाईला 'त्या' दहशतवाद्याची पुन्हा धमकी; म्हणाला...
निवेदनातून माफीनामा
खास विद्यार्थ्यांकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या शेरवेल या नियतकालिकामध्ये प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये सामंत हिने तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. विद्यार्थ्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा गेलेला पाहून मला धक्का बसला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल तर मी त्यांची मनापासून माफी मागते, असे रश्मीने म्हटले आहे.
Edited By - Prashant Patil