
नवी दिल्लीः रवींद्रनाथ टागोर यांचे बांगलादेशमधील घराची जमावाने तोडफोड केल्याच्या घटनेचा भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
पक्षाचे खासदार संबित पात्रा म्हणाले, की ‘बांगलादेश जमात-ए-इस्लामी आणि हेफाजत-ए-इस्लाम बांगलादेश या कट्टरपंथी गटांनी केलेला पूर्वनियोजित हल्ला होता. हा केवळ एका स्मारकावर हल्ला नव्हता, तर भारताच्या सांस्कृतिक आत्म्यावर आणि टागोरांच्या समावेशक तत्वज्ञानावर हल्ला होता.