esakal | खऱ्या स्पायडरमॅनने वाचवले मुलाचे प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

gasama

खऱ्या स्पायडरमॅनने वाचवले मुलाचे प्राण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पॅरिस : फ्रान्स मधील पॅरिस या शहरात लोकांनी खऱ्याखुऱ्या स्पायडरमॅनचा अनूभव घेतला. शहरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बालकनीच्या रेलिंगला एक छोटा मुलगा लटकला होता. त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाने त्याला पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करात एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर स्पायडरमॅन सारखा चढत जाऊन त्याने त्या चिमूरड्याचे प्राण वाचवले. ही घटना पाहून पॅरिस मधील नागरिकही थक्क झाले. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

मामौद गासामा असे त्या तरुणाचे नाव असून, तो 22 वर्षाचा आहे. जगभरातून त्याचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गासामा हा माली देशाचा नागरिक असून, मागील सहा महिन्यांपुर्वी तो फ्रान्समध्ये आला आहे. 

फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों यांनी गासामा याचे आभार मामून एलिसी पैलेस मध्ये येण्याचे आमंत्रनही दिले. फ्रान्स सरकार गासामा याला फ्रान्सचे नागरिकत्वही बहाल करणार आहे.
पॅरिस शहराचे महापौर एनी हिडाल्गो यांनीही गामासा यांची प्रशंसा करणारे ट्विट केले. त्यात हिडाल्गो म्हणाले, "गामासाने मला सांगितले आहे की, मी माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठीच माली मधून पॅरिसमध्ये आलो आहे. मी त्याला म्हणालो तुम्ही जे काम करून दाखवले आहे, हे सर्व नागरिकांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. पॅरिस शहर तुम्हाला तुमची स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्व मदत करेल."
 

loading image