इराणने लपविले वास्तव

वृत्तसंस्था
Tuesday, 4 August 2020

इराणमध्ये १४ हजार चारशे जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले असले तरी त्यांच्याच विविध आकडेवारींवरून जवळपास ४२ हजार जणांचा मृत्यू झाल्याचे उघड होत आहे, असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे. 

लंडन - इराणमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा किमान तिप्पट असल्याचा दावा ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेने केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इराणमध्ये १४ हजार चारशे जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले असले तरी त्यांच्याच विविध आकडेवारींवरून जवळपास ४२ हजार जणांचा मृत्यू झाल्याचे उघड होत आहे, असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे. 

अधिकृत आकडेवारीनुसारही इराण आखाती देशांमधील संसर्गाच्या बाबतीत आघाडीवर  आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, इराणने बाधितांची संख्या २,७८,८२७ अशी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ४,५१,०२४ रुग्णसंख्या आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. 

अहवालातील दावे

  • तेहरानमधील मृतांची संख्या सर्वाधिक (८१२०)
  • एकूण मृतांपैकी १९१६ जण विदेशी नागरिक
  • मार्चमध्ये सरकारच्या आकडेवारीपेक्षा पाचपटीने अधिक संसर्ग
  • मार्चच्या अखेरीस लॉकडाउननंतर रुग्णसंख्येत घट
  • मे महिन्यात निर्बंध उठविल्यावर पुन्हा रुग्ण वाढले. 
  • पहिला रुग्ण सापडल्याचे जाहीर होण्यापूर्वीच ५२ जणांचा मृत्यू झाला
  • Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reality that Iran hid