भारतातील मंदी तात्पुरत्या स्वरूपाची

पीटीआय
शनिवार, 25 जानेवारी 2020

भारताच्या अर्थव्यवस्थेतील मंदी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे आणि आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका (आयएमएफ) क्रिस्टॅलिना जॉर्जिवा यांनी व्यक्त केले आहे.

दावोस - भारताच्या अर्थव्यवस्थेतील मंदी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे आणि आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका (आयएमएफ) क्रिस्टॅलिना जॉर्जिवा यांनी व्यक्त केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक आर्थिक परिषदेच्या २०२० वर्षासाठीच्या वार्षिक संमेलनात त्या बोलत होत्या. ऑक्‍टोबर २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाच्या तुलनेत जानेवारी २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याचेही त्या म्हणाल्या. 

‘‘जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यामध्ये अलीकडेच झालेल्या अमेरिका-चीन या दोन देशांमधील पहिल्या टप्प्याच्या व्यापार कराराचा आणि कर कपातींचाही प्रभाव आहे. मात्र सध्या असलेला ३.३ टक्‍क्‍यांचा आर्थिक विकासदर हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी फारसा चांगला नाही. अधिक कृतीशील आर्थिक धोरणे, रचनात्मक सुधारणा आवश्‍यकता आहे,’’ असेही जॉर्जिवा म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The recession in India is temporary