NASA च्या अंतराळवीराचा विक्रम; अवकाशातील कचरा यानाला धडकला, तरी 371 दिवसांनी पृथ्वीवर परतला

NASA Astronaut Frank Rubio
NASA Astronaut Frank Rubio

नवी दिल्ली- नासाचा एक आणि रशियाचे दोन अंतराळवीर एका वर्षापर्यंत अवकाशात राहिल्यानंतर बुधवारी पृथ्वीवर परत आले. विशेष म्हणजे अमेरिकेच्या फ्रँक रुबियो यांनी अवकाशात सर्वाधिक काळ राहण्याचा रिकॉर्ड बनवला आहे. कजागिस्तानच्या भागात हे तिघे कॅप्सूलच्या माध्यमातून जमिनीवर उतरले. (NASA Astronaut Crewmates Return from Space Mission)

अंतराळवीर ज्या यानामधून अवकाशात गेले होते ते अंतराळातील कचऱ्याला धडकले होते. त्यामुळे यानाचे कुलिंग सिस्टिम खराब झाले होते. अंतराळवीरांना १८० दिवसांच्या मिशनसाठी पाठवण्यात आलं होतं. पण, अपघाताची घटना घडल्याने त्यांना ३७१ दिवस अवकाशात राहावं लागलं. त्यामुळे रुबियो यांनी मार्क वांडे हेई यांच्या तुलनेत दोन आठवडे जास्त अंतराळात काढले आहेत.

NASA Astronaut Frank Rubio
भविष्यात नासा, इस्रोत विद्यार्थ्यांनी काम करतील

नासाकडून सिंगल स्पेसफ्लाईटमध्ये सर्वाधिक वेळ अवकाशात राहण्याचा रिकॉर्ड हेई यांच्याच नावावर होता. अंतराळात सर्वाधिक काळात राहण्याचा रिकॉर्ड रशियाच्या अंतराळवीराच्या नावे आहे. रशियाचा अंतराळवीर तब्बल ४३७ दिवस अवकाशात राहिला आहे. १९९० च्या दशकात झालेला हा रिकॉर्ड अद्याप कोणाला मोडता आलेला नाही. (NASA astronaut Frank Rubio safely landed on Earth )

एका कॅप्सूलच्या माध्यमातून रुबियो, सर्गेई प्रोकोपयेव आणि दिमित्री पेटेलिन यांना पृथ्वीवर परत आणण्यात आले. रिप्लेसमेंट म्हणून फेब्रुवारी महिन्यात दुसरे एक यान अवकाशात पाठवण्यात आलं होतं. अंतराळातील कचरा त्यांच्या पहिल्या कॅप्सूलच्या रेडिएटरमध्ये घुसला होता. त्यामुळे कुलिंग सिस्टिम बंद झाल्याची शक्यता होती. त्यामुळे हे यान कोणत्याही अंतराळवीराशीवाय परत पृथ्वीवर पाठवण्यात आले होते.

NASA Astronaut Frank Rubio
Aliens Carcass:मेक्सिकोच्या संसदेत ठेवण्यात आले 'एलियन्स'चे मृतदेह? 'नासा'ने दिलं 'हे' उत्तर

रुबियो सैन्यात डॉक्टर आणि हेलीकॉप्टर पायलट राहिले आहेत. त्यांनी सांगितलं की अंतराळात एक वर्ष राहायच आहे असं कळालं असतं तर मी तयार झाला नसतो. कुटुंबापासून दूर राहणे त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. रुबियो यांना चार मुले आहेत. परत पृथ्वीवर आल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केलाय. (Latest Marathi News)

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com