esakal | धक्कादायक ! कोरोनापासून बरे झालेल्यांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा लागण
sakal

बोलून बातमी शोधा

recovered corona patient 10 percent again positive

गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असले तरी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे या विषाणूपासून बाधित झालेले रुग्ण बरे होऊन घरीही परतत होते. मात्र, आता एक धक्कादायक बाब समोर आली असून बरे झालेल्या रुग्णांना कोरोनाची परत लागण होत असल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक ! कोरोनापासून बरे झालेल्यांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा लागण

sakal_logo
By
वृत्तसेवा

वुहान : गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असले तरी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे या विषाणूपासून बाधित झालेले रुग्ण बरे होऊन घरीही परतत होते. मात्र, आता एक धक्कादायक बाब समोर आली असून बरे झालेल्या रुग्णांना कोरोनाची परत लागण होत असल्याचे समोर आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. चीनमधील जवळजवळ ७८ हजार लोकं निरोगी झाली आहेत. केवळ ५ हजार लोकं सध्या उपचार घेत आहेत. मात्र, चीनसमोर आता एक नवीन आव्हान उभं राहिलं आहे. कोरोना आजारापासून निरोगी झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक ! ३६ वर्षीय तमिळ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन

पुन्हा कोरोनाची लागण होण्यामागील कारण मात्र अजूनही आरोग्य विभागातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना सुद्धा समजू शकलेले नाही. मात्र, कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान जी औषधं वापरली जातात, त्याचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा शरिरात कोरोना विकसित होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचं ९४ व्या वर्षी निधन

तसेच, रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी ८% ते १०% रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे एकाठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्यामुळे चीनसमोर आता नवीन संकट उभं राहिलं आहे. तत्पूर्वी, चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोनाने जगातील तब्बल १७५ देशांना विळखा घातला. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता जवळपास ०५ लाखाच्या जवळपास पोहोचली आहे.

loading image
go to top