चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचं ९४ व्या वर्षी निधन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचं आज (ता.२७) निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. कला क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने १९९९ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचं आज (ता.२७) निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. कला क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने १९९९ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सतीश गुजराल यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कारही देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. दोन राष्ट्रीय पुरस्कार चित्रकलेतील योगदानासाठी आणि एक राष्ट्रीय पुरस्कार शिल्पकलेतील योगदानासाठी देण्यात आला आहे. 

Coronavirus : १४ एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने रद्द !

सतीश गुजराल यांचा जन्म २५ डिसेंबर १९२५ रोजी झाला होता. त्यांनी लाहोर येथील मेयो स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकला आणि ग्राफिक डिझाईन याचं प्रशिक्षण घेतलं होतं. भारताचे माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांचे ते भाऊ होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Painter and architect Satish Gujral dies at 94