Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

PAK admitted involvement Delhi explosion case : जाणून घ्या, पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरचे पंतप्रधान चौधरी अनवारूल हक यांनी विधानसभेत काय सांगितलं?
POK Prime Minister Chaudhry Anwar-ul-Haq admits Pakistan’s involvement in the Red Fort blast near Delhi, triggering major political and security reactions.

POK Prime Minister Chaudhry Anwar-ul-Haq admits Pakistan’s involvement in the Red Fort blast near Delhi, triggering major political and security reactions.

esakal

Updated on

Chaudhry Anwar-ul-Haq admits Pakistan’s involvement in Red Fort blast : दिल्लीत लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या नेत्यानेच यामध्ये पाकिस्तानच्या सहभागाची कबूली दिल्याचे समोर आले आहे. पाकव्याप्त काश्मिरमधील एका नेत्याने जाहीरपणे सांगितले की, १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांच्या देशाची थेट भूमिका होती. या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले होते.

पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरचे पंतप्रधान चौधरी अनवारूल हक यांनी विधानसभेत सांगितले की, ‘’मी आधीच सांगितले होते की जर तुम्ही (भारत) बलुचिस्तानमध्ये रक्तपात करत राहिलात. तर आम्ही तुम्हाला लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत मारू. अल्लाहच्या मेहरबानीने, आम्ही ते केले... आमच्या शूर सैनिकांनी ते केले.’’

पाकिस्तानने सुरुवातीपासूनच भारतावर बलुचिस्तान प्रांतात अशांतता निर्माण करण्याचा खोटा आरोप केला आहे. मात्र भारताचा दावा आहे की पाकिस्तान सीमापार दहशतवादी कारवायांपासून लक्ष विचलित करण्यासाठी ही युक्ती वापरतो. बलुचिस्तानमधील हिंसाचारात भारताने नेहमीच भूमिका नाकारलेली आहे.

POK Prime Minister Chaudhry Anwar-ul-Haq admits Pakistan’s involvement in the Red Fort blast near Delhi, triggering major political and security reactions.
Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

तर भारतीय गुप्तचर संस्थांनी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा आणि कट रचण्यामागील दहशतवादी टोळीचा संबंध जैश-ए-मोहम्मदशी जोडलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com