Singapore : सिंगापूरप्रमाणे धारावीचा पुनर्विकास!

‘अदानी’तर्फे जागतिक वास्तुविशारद कंपन्यांसोबत करार
Singapore
Singaporeesakal

मुंबई : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी रिअॅलिटीने धारावीच्या पुनर्विकासासाठी कंबर कसली असून जागतिक वास्तुविशारद कंपन्यांशी करार केला आहे. ‘डीआरपीपीएल’तर्फे धारावी पुनर्विकासासाठी शहर आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील जगप्रसिद्ध नियोजनकार आणि तज्ज्ञांना सहभागी करण्यात आले आहे. लवकरच सिंगापूरप्रमाणे धारावीचा विकास होणार असून त्याचा बृहत् आराखडा (मास्टर प्लॅन) सादर केला जाईल.

Singapore
Skin Care Tips : नव्या वर्षात अशा पद्धतीने सेट करा तुमचे स्किनकेअर रूटीन

धारावी पुनर्विकास प्रकल्पाने प्रसिद्ध वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर, डिझाईन फर्म ‘सासाकी’ आणि सल्लागार कंपनी ‘बुरो हॅपोल्ड’ यांच्याशी करार केला आहे. धारावीतील रहिवाशांसाठी जागतिक दर्जाचे शहर निर्माण करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी प्रकल्पाच्या टीममध्ये सिंगापूरमधील तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. धारावी जागतिक दर्जाची वसाहत बनविण्यासाठी ते काम करतील.

हाफीज कॉन्ट्रॅक्टर मुंबईतील सामाजिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) प्रकल्पांसाठी ओळखले जाते. त्यांच्या समावेशामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावीन्यपूर्ण रचनेला अधिक बळ मिळणार आहे. दोन्ही कंपन्या शहर नियोजन आणि पायाभूत अभियांत्रिकीसाठी विख्यात आहेत. ‘सासाकी’ला ७० वर्षांचा वारसा आहे. वसाहतीत खेळकर वातावरण राहील अशी शाश्वत रचना तयार करण्यात त्यांची जागतिक स्तरावर ओळख आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com