esakal | केंद्रीय मंत्री म्हणतात; 'भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा...
sakal

बोलून बातमी शोधा

union minister arjun ram meghwal says bhabhiji papad will be helpful to fight corona virus

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा, असे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

केंद्रीय मंत्री म्हणतात; 'भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा, असे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video: युवती गेल्या सेल्फी काढायला नदीत अन्...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा हातात पापडचे पॅकेट आहे. ते पॅकेट 'भाभीजी पापड' कंपनीचे आहे. हे पापड खाल्यावर कोरोना होत नाही किंवा बाधित रुग्ण कोरोनामुक्त होतो, असा दावा त्यांनी केला आहे. अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले आहे की, 'भाभीजी पापड' खाल्याने शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढणारे अँटिबॉडी तयार होतात. एका व्यावसायिकाने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 'भाभीजी पापड' नावाने पापडची कंपनी सुरु केली. हे पापड कोरोनाविरोधात लढण्यासाठी मदत करतील. त्यामुळे 'भाभीजी पापड'च्या व्यावसायिकाला माझ्याकडून शुभेच्छा. ते नक्की यशस्वी होतील'

दरम्यान, जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे अनेकजण कोरोनावर उपचारबाबत वेगवेगळे दावा करत आहेत. कोणत्याही खाद्य पदार्थाने कोरोनावर मात करता येऊ शकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पण, कोरोनाची लागण होऊ नये किंवा कोरोनावर मात करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवणं जरुरीचं आहे. त्यासाठी पौष्टिक अन्न खावे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

Video: 'हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं!'