ट्रम्प, किम संरक्षणाची जबाबदारी गुरख्यांवर 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

लढाऊपणाचा प्राचीन वारसा 
सिंगापूरमधील गुरखांचा ब्रिटिश परंपरेशी जवळचा संबंध आहे, मागील दोनशे वर्षांपासून नेपाळी गुरखा हे सिंगापूरमध्ये संरक्षणाचे काम करत आले आहेत. 19 व्या शतकामध्ये अँगलो नेपाळी युद्धामध्ये इंग्रज सैन्याला सपाटून मार खावा लागला होता. यानंतर गुरखा सैनिकांचे कौशल्य इंग्रजांच्या लक्षात आले आणि त्यांनी गुरखा सैनिकांची लष्करामध्ये भरती करायला सुरवात केली. ब्रिटिश, भारतीय, नेपाळी, ब्रुनेई आणि सिंगापूरच्या लष्करात मोठ्या संख्येने गुरखा सैनिक आहेत. 

सिंगापूर, ता. 5 (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांच्यात पुढील महिन्यामध्ये होणारी बैठक अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक ठरणार आहे. विशेष म्हणजे या वेळी दोन्ही नेत्यांच्या संरक्षणाची जबाबदारी जगातील सर्वांत जुनी लढवय्यी जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळी गुरख्यांकडे असेल. 

या दोन्ही नेत्यांसोबत त्यांचे स्वत:चे सुरक्षा दल असेलच, पण संमेलनस्थळाला सिंगापूर पोलिस आणि गुरखा अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच मिळणार. या संमेलनस्थळाच्या दिशेने जाणारे रस्ते आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असणाऱ्या हॉटेलांभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. ज्या शांगरिला हॉटेलमधील संमेलनात किम आणि ट्रम्प यांच्यामध्ये बोलणी होणार आहे, त्या संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटीस आणि अन्य देशांचे नेते देखील सहभागी होणार आहेत. या वेळी गुरखा सैनिकांकडे बेल्जियन बनावटीच्या एफएन स्कार रायफली आणि पिस्तुले दिली जातील. गुरखा सैनिकांची ओळख असणारी कुकरीदेखील त्यांना दिली जाऊ शकते. दरम्यान, सिंगापूर पोलिसांच्या प्रवक्‍त्याने नेमके किती गुरखा जवान संमेलनस्थळी तैनात केली जातील याची अधिकृत माहिती दिलेली नाही. 

लढाऊपणाचा प्राचीन वारसा 
सिंगापूरमधील गुरखांचा ब्रिटिश परंपरेशी जवळचा संबंध आहे, मागील दोनशे वर्षांपासून नेपाळी गुरखा हे सिंगापूरमध्ये संरक्षणाचे काम करत आले आहेत. 19 व्या शतकामध्ये अँगलो नेपाळी युद्धामध्ये इंग्रज सैन्याला सपाटून मार खावा लागला होता. यानंतर गुरखा सैनिकांचे कौशल्य इंग्रजांच्या लक्षात आले आणि त्यांनी गुरखा सैनिकांची लष्करामध्ये भरती करायला सुरवात केली. ब्रिटिश, भारतीय, नेपाळी, ब्रुनेई आणि सिंगापूरच्या लष्करात मोठ्या संख्येने गुरखा सैनिक आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Responsibility for Trump, Kim on Gokhakhas