हफीझ सईदचे बँक खाते पुन्हा सुरू

वृत्तसंस्था
Monday, 13 July 2020

जमात-उद-दावा आणि लष्करे तैबा या बंदी असलेल्या दहशतवादी गटाशी संबंधित असलेल्या व्यक्तींची खाती पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. यात जमात-उद-दावाचा म्होरक्या हफीझ सईद याचाही समावेश आहे.

रावळपिंडी - जमात-उद-दावा आणि लष्करे तैबा या बंदी असलेल्या दहशतवादी गटाशी संबंधित असलेल्या व्यक्तींची खाती पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. यात जमात-उद-दावाचा म्होरक्या हफीझ सईद याचाही समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

द न्यूजच्या वृत्तानुसार संयुक्त राष्ट्रांच्या (युएन) सुरक्षा परिषदेच्या मंजुरी समितीच्या औपचारिक संमतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. अब्दुल सलाम भुट्टावी, हाजी एम. अश्रफ, याह्या मुजाहीद आणि झफर इक्बाल यांचीही खाती सुरु करण्यात आली.जमात-उद-दावाच्या प्रत्येक नेत्याने संयुक्त राष्ट्रांना तसे आवाहन केले होते. कौटुंबिक व्यवहार चालविण्यासाठी खाती सुरु करण्याचे  कारण त्यांनी दिले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारला केलेल्या विनंती पत्रातही हेच कारण देण्यात आले होते. त्यात आर्थिक उत्पन्न, उत्पन्नाचे स्रोत याचा तपशीलही होता. हेच विनंती पत्र संयुक्त राष्ट्रांना पाठविण्यात आले होते.

दहशतवादी तुरुंगात
बँक खाती सुरु करण्यात आलेले बहुतेक दहशतवादी तुरुंगात असून त्यांना एक ते पाच वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. पंजाब दहशतवादविरोधी खात्याने त्यांच्यावर दहशतवादासाठी आर्थिक निधी पुरविण्याचा आरोप ठेवला आहे.

Edited by : Kalyan Bhalerao


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restored the bank accounts mumbai terror attack mastermind Hafiz Saeed

Tags
टॉपिकस
Topic Tags: