esakal | प्यार की निशानी! ४७ वर्षांनंतर सापडली पतीची हरवलेली अंगठी
sakal

बोलून बातमी शोधा

प्यार की निशानी! ४७ वर्षांनंतर सापडली पतीची हरवलेली अंगठी

प्यार की निशानी! ४७ वर्षांनंतर सापडली पतीची हरवलेली अंगठी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

काही वस्तू आपल्याला प्राणापेक्षाही प्रिय असतात.त्यामुळे अशा जिव्हाळ्याच्या वस्तू आपण कायम जीवापाड जपत असतो. परंतु, अत्यंत जपत आलेली वस्तू अचानक आपल्या नजरेआड झाली, ती हरवली तर सहाजिकच आपण कासावीस होतो.त्यातच अथक प्रयत्न केल्यानंतरही ती सापडली नाही. तर, ठराविक वेळेनंतर आपण तिची आशा सोडून देतो. परंतु, बऱ्याच वर्षानंतर तुमची हरवलेली वस्तू अचानक तुमच्या समोर आली तर? अर्थात तो आनंद शब्दांत व्यक्त करणं शक्य नाही. असाच एक प्रकार अमेरिकेत (America) घडला आहे. एका महिलेची ४७ वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी (ring) सापडली आहे. (ring-misplaced-in-us-47-years-ago-found-in-finland-forest)

अमेरिकेत राहणाऱ्या डेब्रा मॅक्केना ( Debra McKenna ) यांच्या पतीने त्यांना दिलेली अंगठी ४७ वर्षांपूर्वी हरवली होती. मात्र, तब्बल इतकी वर्ष उलट्यानंतर ही अंगठी त्यांना फिनलँडच्या (Finland ) जंगलात सापडली आहे. फिनलँडच्या करीना पार्क येथे आसन तयार करणाऱ्या एका कामगाराला काम करत असतांना हा अंगठी सापडली. विशेष म्हणजे ही अंगठी जवळपास २० सेंटीमीटर खोल मातीमध्ये होती.

या अंगठीसोबत डेब्रा यांचे दिवंगत पती शान यांच्या काही आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळे ही अंगठी इतक्या वर्षानंतर पाहिल्यावर डेब्रा थक्क झाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळादेखील दिला. "१९७३ मध्ये हायस्कूलला असतांना आम्ही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ही अंगठी शानच्या हातात होती. पण, हायस्कूलच्या शेवटच्या वर्षी त्याने ही अंगठी मला दिली होती. पण, चुकून माझ्याकडून ती डिपार्टमेंटच्या स्टोरमध्ये राहिली आणि नंतर परत ती सापडलीच नाही", असं डेब्रा यांनी सांगितलं.

दरम्यान, या अंगठीवर S आणि M ही दोन अक्षरं कोरली होती. त्यामुळे डेब्राने ती लगेच ओळखली. डेब्रा आणि शान जवळपास ४० वर्ष एकत्र राहिले. त्यानंतर २०१७ मध्ये शानचं निधन झालं.