
सायबेरियापासून अलास्कापर्यंतचा मोठा भाग हा भूकंप आणि त्सुनामीसाठी ओळखला जातो. दरवर्षी इथं अनेक भूकंप येतात आणि त्सुनामीच्या लाटांचा तडाखाही बसतो. पण असं का होतं? पृथ्वीचं विज्ञान आणि भूगोल यामागे आहे. याच भागात असं का होतं? याला रिंग ऑफ फायर असं का म्हणतात या प्रश्नांची उत्तरं आपण पाहू. सायबेरियापासून अलास्कापर्यंत दरवर्षी हजारो भूकंप आणि त्सुनामीच्या घटना घडतात. याशिवाय या परिसरात ज्वालामुखीही मोठ्या प्रमाणावर आहे.