स्वीडनमध्ये मुस्लीमविरोधी गटाने कुरानला लावली आग; दंगल उसळली

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 30 August 2020

स्वीडनमध्ये उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी मालमो शहरात पवित्र कुरान जाळल्याची घटना घडली आहे.

स्टॉकहोम- स्वीडनमध्ये उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी मालमो शहरात पवित्र कुरान जाळल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या विरोधात ३०० लोक एकत्र आले होते, त्यानंतर दंगली भडकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंगलकर्त्यांनी अनेक ठिकाणी आग लावली आणि पोलिस व मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केलं. रस्त्यावर अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले, तर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे अनेक पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. 

दंगलीच्या आरोपाखाली जवळजवळ १५ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे टीटी वृत्त संस्थेने दिलेल्या बातमीनुसार, शुक्रवारी दुपारी कुरान जाळण्याची घटना घडली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसा उसळली. बातमीनुसार, उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी कुरान जाळले आहे. शिवाय या घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियामध्ये पोस्ट केला आहे. त्यानंतर, याप्रकरणात तीन लोकांना अटक करण्यात आली होती. 

चक्क आरोग्य मंत्र्यांनी स्वच्छ केलं कोविड रुग्णालयातील शौचालय! (Video)

'यूनायटेड नेशन्स अलायंस ऑफ सिविलाईझेशन्स'च्या अध्यक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, संघटना प्रमुखांनी उजव्या विचाऱ्यांच्या कट्टर कार्यकर्त्त्यांनी कुरान जाळल्याच्या घटनेची निंदा केली आहे. तसेच या घटनेला पूर्णपणे अस्वीकार्य ठरवले आहे. यासोबतच त्यांनी लोकांना हिंसा संपवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, कट्टर उजव्या विचारांच्या डॅनिश पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या रॅमस पालूदान यांना याप्रकरणात दोन वर्षांसाठी स्वीडनमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पालूदान यांना मालमो येथे अटक करण्यात आली आहे. पालूदान सुरुवातीपासून मुस्लीमविरोधी राहिले आहेत. त्यांनी यापूर्वीही कुरान जाळण्याचा प्रकार केला होता. पालूदान यांच्यावर बंदी आणण्यात आलेल्याने पुन्हा दंगली भडकल्या आहेत.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riot in Sweden after kuran burning incident anti Muslim Danish leader banned