आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ब्रिटनवासियांना सूनक यांनी दिला विश्वास; म्हणाले...

किंग चार्ल्स तिसरे यांनी सूनक यांची पंतप्रधानपदी केली नियुक्ती. यानंतर त्यांनी ब्रिटनच्या जनतेला संबोधित केलं.
rishi sunak
rishi sunak

लंडन : किंग चार्ल्स तिसरे यांनी ऋषी सूनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली. यानंतर सूनक यांनी ब्रिटनवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील अर्थव्यवस्थेच्या सुधारणांबाबत भाष्य केलं. ब्रेग्झिटच्या संधींचा फायदा मिळावा यासाठी माझं सरकार काम करेल असं त्यांनी म्हटलं आहे. (Rishi Sunak addressed British people after taken charge of post of PM says on economic policies)

सूनक म्हणाले, ज्यांचा मी उत्तराधिकारी राहिलो आहे त्या लिझ ट्रस यांना मी अभिवादन करतो. त्यांना देशाचा विकास करायचा होता त्यामुळं त्यांची धोरणं चुकीची नव्हती. हे वैश्विक ध्येय आहे, मी बदल घडवणाऱ्या त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो, पण यामध्ये काही चुका झाल्या. पण आता माझं सरकार अशी अर्थव्यवस्था तयार करेल जे ब्रेग्झिटच्या संधी निर्माण करेल.

rishi sunak
Uganda School Fire: युगांडात अंध मुलांच्या शाळेला भीषण आग, 11 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

प्रत्येक पातळ्यांवर आमचं सरकार हे प्रामाणिक, प्रोफेशनल आणि जबाबदार असेल याचा तुम्हाला विश्वासही देतो आणि आम्ही विश्वासही कमाऊ. अनेकांनी केलेल्या त्यागासाठी आम्ही ब्रिटनसाठी योग्य भविष्य घडवू आणि त्यानंतरचा प्रत्येक दिवस आशावादी बनवू, असंही सूनक म्हणाले.

rishi sunak
Eknath Shinde in Gadchiroli : नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांची दिवाळी

आपल्या देशाचं भविष्य उज्वलं व्हावं. आपल्या गरजा राजकारणापेक्षावर रहाव्यात तसेच माझ्या पक्षाच्या उत्कृष्ट परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे सरकार देण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो, असंही ब्रिटनच्या जनतेला संबोधित करताना ऋषी सूनक यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com