Rishi Sunak : PM झाल्यावर दिवाळीला दिवे लावले? व्हिडिओ पाहून चित्रा वाघसुद्धा फसल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishi Sunak
Rishi Sunak : PM झाल्यावर दिवाळीला दिवे लावले? व्हिडिओ पाहून चित्रा वाघसुद्धा फसल्या

Rishi Sunak : PM झाल्यावर दिवाळीला दिवे लावले? व्हिडिओ पाहून चित्रा वाघसुद्धा फसल्या

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे ५७ वे पंतप्रधान बनले आहेत. सध्या सोशल मीडियावर ऋषी सुनक यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते घराच्या दारात दिवे लावताना दिसत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आपल्या घरासमोर दिवे लावले आहेत, असा दावा केला जात आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना वाघ आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, "ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक, पहिल्यांदा कार्यालयात पाऊल ठेवण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या दारात दीप प्रज्वलन करताना...गर्व से कहो हम हिंदू है..." मात्र आता या व्हिडीओमागचं सत्य समोर आलं आहे.

माध्यमांच्या काही रिपोर्ट्सनुसार, ऋषी सुनक यांचा हा फोटो २०२० सालचा आहे. त्यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त लंडनमधल्या डाऊनिंग स्ट्रीट इथल्या आपल्या घराच्या दारात रांगोळी आणि दिवे लावले होते. त्यावेळी ऋषी ब्रिटनचे चान्सलर होते आणि त्यांचा हा फोटो तेव्हाही चर्चेत आला होता. अनेक परदेशी, तसंच भारतीय वेबसाईट्सने १३ नोव्हेंबर २०२० ला हा फोटो प्रकाशित केला होता. त्यामुळे पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी यांनी दिवाळीनिमित्त दिवे लावले हा दावा चुकीचा आहे. हा फोटो आत्ताचा नसून दोन वर्षे आधीचा आहे.

टॅग्स :Chitra Wagh