Britain: भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचं पंतप्रधानपद जवळपास निश्चित; बोरिस जॉन्सन यांनी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishi Sunak & Boris Johnson

Rishi Sunak: भारतीय वंशाचे सुनक यांचं पंतप्रधानपद जवळपास निश्चित; बोरिस जॉन्सन यांनी...

Britain: ऋषी सुनक यांनी काल पंतप्रधान पदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनमध्ये पंतप्रधान पदासाठी निवडणूक होतेय. आता तर बोरिस जॉन्सन यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सुनक यांचं पंतप्रधानपद जवळपास निश्चित समजलं जात आहे.

Britain Election Boris Johnson

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतली आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचं पंतप्रधानपद जवळपास निश्चित मानलं जातंय. जॉन्सन यांनी रविवारी रात्री आपला निर्णय जाहीर केला. ''ही योग्य वेळ नाही'' असं जॉन्सन म्हणालेत.

कालच ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. ब्रिटनची अर्थव्यवस्था आम्हाला बळकट करायची आहे. पक्षाला एकजूट करुन देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यासाठीच पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवत आहे, असं सुनक म्हणाले होते. जॉन्सन यांच्या माघारीमुळे सुनक यांचं पंतप्रधानपद निश्चित मानलं जातंय.

ब्रिटनच्या पंतप्रधान (Prime Minister of Britain) लिझ ट्रस (Liz Truss) यांनी 45 दिवसांच्या कार्यकाळानंतर गुरुवारी अचानक राजीनामा दिला. लिझ ट्रस राजीनामा देणार असल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून लावला जात होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांची पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी स्पर्धा सुरु होती. आता लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :electionbritain