सुनक चौथ्या फेरीत विजयी; ब्रिटनचे पुढील PM होण्याच्या पोहोचले जवळ

rishi sunak
rishi sunak esakal

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक हे ताज्या फेरीत विजयी झाले असून ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याच्या जवळ पोहचले आहेत. सुनक हे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री होते. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर नव्या पंतप्रधानपदासाठी निवडणूक होत आहे. (Rishi Sunak wins latest round edges closer to become next British PM)

सुनक हे ताज्या चौथ्या फेरीत विजयी ठरले असून त्यांना ११८ मतं मिळाली आहेत. त्यामुळं ते सध्या बोरिस जॉन्सन यांना बदलण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. १९ जुलै रोजी चौथ्या फेरीच्या मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये सुनक पुन्हा एकदा अव्वल स्थानी राहिले आहेत. तिसऱ्या फेरीत त्यांनी ११५ मतं मिळवली होती. त्यानंतर चौथ्या फेरीत ११८ मतं मिळवली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी व्यापार मंत्री पेनी मोरडॉन्ट यांना चौथ्या फेरीत ९२ मतं मिळाली. तसेच विदेश सचिव लिझ ट्रस यांना ८६ मतं मिळाली. यानंतर आता बुधवारी उरलेले तीन उमेदवार शेवटच्या फेरीत पोहोचतील. तर उर्वरित दोन उमेदवार हे देशभरात टोरी पार्टीच्या सदस्यांचा प्रचार करतील.

...तर सूनक ब्रिटनचे पंतप्रधान होणारे पहिले आशियाई ठरतील

भारतीय वंशाच्या ब्रिटीश खासदार, ज्यांना आता 118 खासदारांचा पाठिंबा आहे. त्यांनी आता अंतिम दोनमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतील त्याची 5 सप्टेंबर रोजी नवीन कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि ब्रिटिश पंतप्रधान म्हणून निवड केली जाईल. जर सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले तर ते हे पद भूषवणारे पहिले भारतीय किंवा आशियाई वंशाचे व्यक्ती ठरतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com