कोरोनानंतर आता 'या' रोगाचा धोका; काय आहेत लक्षणं?

Risk Of Spreading Chinese City Warns Of Bubonic Plague After 2 Cases
Risk Of Spreading Chinese City Warns Of Bubonic Plague After 2 Cases

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असताना चीनमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर चीनमधील एका शहरामध्ये रविवारी ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर आरोग्य यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, मंगोलियाच्या स्वायत्त क्षेत्रातील बयन्नुरमध्ये ब्यूबॉनिक प्लेगवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिसऱ्या स्तरावरील इशारा दिला आहे. ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण बयन्नुरमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जारी केलेला सतर्कतेचा इशारा हा २०२० च्या शेवटपर्यंत लागू राहणार आहे.
-------------
धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक; स्वतःच केली फेसबुक पोस्ट
-------------
सावधान हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग !
------------
चीनमध्ये या ब्यूबोनिक प्लेगबरोबरच पीग इन्फ्लूएन्जाचीही भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. चीनमधील अँगीकल्चरल युनिव्हर्सिटी म्हणजेच शेतीसंदर्भातील संशोधन करणाऱ्या विद्यापिठातील शासस्त्रज्ञ तसेच चीनमधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन या संस्थेप्रमाणेच इतर संस्थानी पीग इन्फ्यूएन्जा हा आजार डुक्करांच्या माध्यमातून पसरु शकतो असं म्हटलं आहे.

ब्यूबॉनिक प्लेगची लक्षणं काय आहेत?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, अचानक ताप येणे, थंडी वाजणे, डोके व अंगदुखी आणि अशक्तपणा, उलट्या होणे आणि मळमळ होणे ही ब्यूबोनिक प्लेगची प्रमुख लक्षणं आहेत, या आजारामध्ये शरीरावर लिम्फ नोड म्हणजेच मोठ्या आकाराच्या गाठी तयार होतात. त्याला बल्ब म्हणतात. वेळीच उपचार न मिळाल्यास या गाठीचा आकार एखाद्या कोंबडीच्या अंडाचा आकारऐवढा वाढू शकतो. संसर्गाचे प्रमाण अधिक असेल तर शरीरावरील सूजलेल्या लिम्फ नोड्समधून पू बाहेर पडतो आणि फोडांचे रुपांतर जखमांमध्ये होते. आजाराच्या पुढच्या टप्प्यात तो न्यूमोनिक प्लेगमध्ये रुपांतरीत होतो. मेयो क्लिनिकच्या मते सेप्टिकाइमिक प्लेगमुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊन शरीराच्या पेशी मृत होतात. त्यानंतर बोटं आणि नाकाची त्वचा काळी पडते.

काय आहे ब्यूबॉनिक प्लेग?
ब्यूबॉनिक प्लेगला ग्लिटीवाला प्लेग असही म्हणतात. या आजारामध्ये शरीराला असह्य वेदना होतात, खूप ताप येतो तसेच नाडीचे ठोके वाढतात. त्यानंतर शरीरावर फोड येतात आणि दोन आठवड्यांमध्ये ते पिकतात. शरीरावर फोड आल्यानंतर त्वाचेची प्रचंड जळजळ होते. प्लेग हा उंदारांमार्फत पसरणारा रोग आहे. उंदीर मेल्यानंतर त्याच्या शरीरावरील पिसवांच्या माध्यमातून प्लेगच्या विषाणूंचा संसर्ग मानवाला होतो. उंदारच्या शरीरावरील पिसवे मानवाचा चावल्याने प्लेगचा संसर्ग होतो. उंदीर मेल्यानंतर जवळजवळ दोन ते तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये प्लेगचा संसर्ग मानवाला होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com