लहानपणीच्या अत्याचारामुळे गर्भाशयाच्या विकाराचा धोका 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

वॉशिंग्टन : लहानपणी अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना गर्भाशयासंबंधी होणारे विकार होण्याची शक्‍यता असते, असा निष्कर्ष गर्भाशयासंबंधी होणारे विकार (एंडोमेट्रीओसिस) व बाल शोषण यामधील संबंधाचा अभ्यास करताना पुढे आले आहेत. 
या अभ्यासासाठी रजोनिवृत्तीपूर्वी "एंडोमेट्रीओसिस'चा त्रास असलेलेल्या 60 हजार 595 महिलांशी संवाद साधण्यात आला. त्यापैकी 31 टक्के महिलांनी सांगितले की, बालपणात त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाले आहेत. 

अन्य 12 टक्के महिलांवर लहानपणी लैंगिक अत्याचार झाले होते, तर दोन्ही प्रकारच्या अत्याचाराला सामोरे जावे लागलेल्या महिलांची संख्या 21 टक्के होती. "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ अँड ह्युमन डेव्हलपमेंट'च्या "ह्युमन रिप्रॉडक्‍शन' या नियतकालिकात यासंदर्भातील लेख प्रसिद्ध झाला आहे, अशी माहिती होली हॅरिस यांनी दिली. हॅरिस हे सिएटल येथील फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च सेंटरमधील अंडाशयाचा कर्करोग आणि "एंडोमेट्रीओसिस' या विषयाच्या संशोधक आहेत.

बाल शोषण व "एंडोमीट्रीओसिस' या दोन्ही गोष्टी टाळायला हव्यात, हेच या अभ्यासातून दिसून येते, असे हॅरिस म्हणाले. लहानपणी घडलेल्या या आघातामुळे त्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम कसा झाला, हेही काही जणींनी नमूद केले आहे. 

Web Title: The risk of uterine disorder due to childhood atrocities