esakal | रोबोटीक झाड देणार शुद्ध हवा!
sakal

बोलून बातमी शोधा

रोबोटीक झाड

मेक्सिकोतील शास्त्रज्ञांनी एक रोबोटीक झाड बनविले आहे. जे वातावरणातील प्रदूषित हवा शोषून घेत, शुद्ध हवेचा पुरवठा करते. त्या झाडाचे नाव आहे 'बायो अर्बन'. 

रोबोटीक झाड देणार शुद्ध हवा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सध्या जगातील अनेक महत्वाची शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. उत्तर अमेरिकेतील मेक्सिको शहरही त्यापैकीच एक आहे. मात्र, वायू प्रदूषणाच्या या समस्येचा सामना करण्यासाठी येथील शास्त्रज्ञांनी एक रोबोटीक झाड बनविले आहे. जे वातावरणातील प्रदूषित हवा शोषून घेत, शुद्ध हवेचा पुरवठा करते. त्या झाडाचे नाव आहे 'बायो अर्बन'. 

वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, बायो अर्बन हे झाड दररोज जवळपास २ हजार ८९० लोकांना शुद्ध हवेचा पुरवठा करू शकते. तसेच हे झाड ३६८ नैसर्गिक झाडांइतकी शुद्ध हवेची निर्मिती करते.' यासाठी या झाडात प्रकाश संश्लेषणाची प्रणाली बसविण्यात आली आहे. जी झाडाने शोषून घेतलेल्या प्रदूषित हवेचे शुद्धीकरण करते.

शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, हे झाड नैसर्गिक झाडांना पर्याय म्हणून बनवण्यात आलेले नाही. तर याची उभारणी ही अशा ठिकाणी केली जाईल. ज्या ठिकाणी पादचाऱ्यांची, सायकल चालवणाऱ्यांची व सार्वजनिक वाहतुकीची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते.

३५ लाख रुपये खर्च

हे ४ मीटर लांबीचे झाड मेक्सिकोतील प्यूबेला शहरात उभारण्यात आले असून, त्याच्या निर्मितीसाठी ३५ लाख रुपयांचा खर्च आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य देशांतील शहरांमध्ये देखील या झाडाची उभारणी केली जाणार आहे.

आत्तापर्यंत अशा ३ झाडांची निर्मिती 

२०१६ मध्ये लॉन्च झालेल्या बायोमीटेक कंपनीच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत अशा ३ झाडांची निर्मिती करण्यात आली आहे. प्यूबेला, कोलंबिया आणि पनामा या तीन अमेरिकन शहरांमध्ये त्यांची उभारणी करण्यात आली आहे.

loading image
go to top