esakal | 'पतीची हत्या कशी करावी?'च्या लेखिकेने केली पतीची हत्या?
sakal

बोलून बातमी शोधा

Nancy Crampton Brophy

'पतीची हत्या कशी करावी?'च्या लेखिकेने केली पतीची हत्या?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

ओरेगॉन : 'पतीची हत्या कशी करावी?' या पुस्तकाच्या लेखिकेने पतीची हत्या केली असून, तीन महिन्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अटक केली. परंतु हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अमेरिकेतील 68 वर्षीय लेखिका नॅन्सी क्रॅम्पटन ब्रोफी या प्रेमकथा लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी 'हाऊ टू मर्डर युवर हजबंड' हा निबंध लिहीला आहे. नॅन्सी यांच्यावर 63 वर्षीय पती डॅनियल ब्रोफी यांच्या हत्येचा आरोप आहे. 2 जून रोजी नॅन्सी यांच्या पतीची संशयास्पदरित्या हत्या झाली होती. त्यांचा मृतदेह शाळेच्या स्वयंपाक घरात आढळला होता. स्वत: नॅन्सी यांनी फेसबुकवर शोकसंदेशही लिहिला होता. तीन महिन्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

लेखिका नॅन्सी क्रॅम्पटन ब्रोफी यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहे. अमेझॉनवर त्या लिस्टेडही करण्यात आले आहे. नॅन्सी यांनी 2011 मध्ये पतीची हत्या करण्याच्या पद्धतीवर एक निबंधही लिहिला आहे. नॅन्सीने या निबंधात हत्येबाबत आपले विचार मांडले होते. त्यामध्ये म्हटले आहे की, 'प्रेम-गूढकथा लिहिणारी लेखिका म्हणून मी हत्या आणि त्यानंतर होणाऱ्या पोलिस प्रक्रियेबाबत अनेक तास विचार केला. इतकंच नाही तर या निबंधात त्यांनी हत्येच्या तुलनेत घटस्फोट खर्चिक असतं."

पतीच्या हत्येच्या आरोपातून माझी सुटका होईल. मला माझा वेळ कारागृहात घालवायचा नाही, असेही नॅन्सी यांनी म्हटले आहे.

loading image