रोमचे ‘फ्युमिचिनो’ ठरले फाइव्ह स्टार विमानतळ 

वृत्तसंस्था
Saturday, 19 September 2020

सातत्याने केली जाणारी स्वच्छता आणि कार्यक्षमता या मुद्यांच्या आधारावर अधिक गुण मिळविले. प्रवासाला निघणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी घेणारे युरोपमधील पहिले विमानतळ हा मानही फ्युमिचिनो विमानतळाला मिळाला आहे. 

रोम : अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अनेक देश सर्व व्यवहार सुरु करत असले तरी संसर्गाचा धोका अद्यापही टळला नसल्याने सर्वत्र कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये इटलीतील फ्युमिचिनो विमानतळाने आघाडी घेतली असून ‘कोविड १९ फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळविणारे ते जगातील पहिले विमानतळ ठरले आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्योगामध्ये सर्वोत्तमतेसाठी विमानतळांची पाहणी करून मानांकन देणाऱ्या ‘स्कायट्रॅक्स’ या संस्थेने रोममधील फ्युमिचिनो विमानतळाची निवड केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या संस्थेने विमानतळावर राखली जाणारी आरोग्यासंदर्भातील स्वच्छता हा निकष लावून विमानतळांची पाहणी केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इटलीतील सर्वाधिक व्यग्र विमानतळांपैकी एक असले तरी फ्युमिचिनो विमानतळाने प्रवाशांना सहज दिसतील अशा विविध भाषांमधील सूचना, मास्क सक्तीची कडक अंमलबजावणी, सातत्याने केली जाणारी स्वच्छता आणि कार्यक्षमता या मुद्यांच्या आधारावर अधिक गुण मिळविले. प्रवासाला निघणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी घेणारे युरोपमधील पहिले विमानतळ हा मानही फ्युमिचिनो विमानतळाला मिळाला आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rome's Fiumicino Airport has become the first airport in the world