Spain Restaurant Roof Collapse: स्पेनमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळी रेस्टॉरंटचे छत कोसळून चौघांचा मृत्यू, 21 जण जखमी

Spain popular tourist island: स्पेनमघ्ये एका रेस्टॉरंटचे छत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ जण जखमी झाले आहेत.
Spain News
Spain News
Updated on

Spain Madrid News- स्पेनमघ्ये एका रेस्टॉरंटचे छत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ जण जखमी झाले आहेत. स्पेनमध्ये प्रसिद्ध पर्यटन स्थळ आईसलँड मॅलोर्का येथे ही घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आपात्कालीन सेवा विभागाचे प्रवक्ते यांनी सांगितलं की, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ जण जखमी झाले आहेत. यात प्रामुख्याने पर्यटकांचा समावेश आहे. यासंदर्भात स्पेन आपात्कालीन विभागाने 'एक्स'वर माहिती दिली आहे.

Spain News
Bangladesh MP Murdered: बांग्लादेशच्या खासदाराची भारतात कशी झाली हत्या? कट कोणी रचला? धक्कादायक खुलासा

रिपोर्टसार, जखमींपैकी सात जणांची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि इतर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

स्थानिक माध्यमानुसार, पाल्मा डि मॅलोर्का शहराच्या मल प्लाया दी पाल्मा परिसरामध्ये दोन मजली बिल्डिंग आहे. या बिल्डिंगचे छत अचानक कोसळले. अग्निशन दल आणि अॅम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच परिसर सील करण्यात आला होता. इतर काही लोक अडकले आहेत का? याचा देखील शोध घेतला जात आहे.

Spain News
Scarlett Johansson vs OpenAI: स्कार्लेटच्या आवाजाची हुबेहुब 'कॉपी'! तिने कायद्याचा धाक दाखवताच OpenAI ची तलवार म्यान

स्पॅनिश पंतप्रधान पेड्रो सॅनचेझ Pedro Sanchez यांनी याप्रकरणी दु:ख व्यक्त करत पीडित कुटुबीयांसाठी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असं ते म्हणाले आहेत. मॅलोर्का हे स्पेनमधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. सरकारी माहितीनुसार, दरवर्षी या ठिकाणी १.४ कोटी पर्यटक येत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com