Scarlett Johansson vs OpenAI: स्कार्लेटच्या आवाजाची हुबेहुब 'कॉपी'! तिने कायद्याचा धाक दाखवताच OpenAI ची तलवार म्यान

ChatGPT voice :हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सन (Scarlett Johansson) आणि OpenAI कंपनीमध्ये वाद निर्माण झाला आहे.
Scarlett Johansson sam altman
Scarlett Johansson sam altman
Updated on

वॉशिंग्टन- हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सन (Scarlett Johansson) आणि OpenAI कंपनीमध्ये वाद निर्माण झाला आहे. OpenAI कंपनीने त्यांच्या चाटजीपीटीसाठी (ChatGPT) वापरलेला आवाज जवळपास माझ्या आवाजासारखा असल्याचा दावा स्कार्लेटने केला होता. याप्रकरणी तिने कायदेशीर पाऊल उचलण्याची तयारी केली होती. त्यानंतर OpenAI ने कथित ChatGPT वरुन आवाज मागे घेतला आहे.

स्कार्लेट काय म्हणाली?

स्कार्लेट जॉन्सनने केलेल्या दाव्यानुसार, ओपनएआय कंपनीने तिच्याशी संपर्क करून एका प्रोजेक्टसाठी तिचा आवाज देण्याची मागणी केली होती. पण, तिने नीट विचार करून ऑफर नाकारली होती. त्यानंतर काही महिन्यांनी तिच्यासारखा हुबेहुब आवाज कंपनीने वापरल्याचा तिने दावा केलाय. 'स्काय' नावाने तिचा आवाज वापरला गेला असं सांगण्यात आलंय.

Scarlett Johansson sam altman
Pragya Misra: OpenAI ने भारतात केली पहिली नियुक्ती; कोण आहेत प्रज्ञा मिश्रा ज्यांना दिली आहे महत्त्वाची जबाबदारी?

सॅम अल्टमन काय म्हणाल?

ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कार्लेट जॉन्सनसारखा आवाज करण्याचा कोणताही हेतू नव्हता. 'स्काय'च्या आवाजामागे दुसऱ्या एकाचा आवाज आहे. आवाज मागे घेण्याबाबत स्पष्टीकरण देताना सॅम अल्टमन यांनी सांगितलं की, 'जॉन्सन यांच्याबाबत आदर असल्याने आम्ही आमच्या प्रोडक्टमधून 'स्काय'चा आवाज मागे घेतला आहे. आम्ही त्यांच्याशी योग्यपणे संवाद साधला नाही, त्याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.'

स्कार्लेटने सांगितलं की, त्यांच्या या कृतीमुळे मला कायदेशीर मदत घ्यावी लागली. त्यासंदर्भात सॅम अल्टमन यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्यांनी कोणत्या माध्यमातून 'स्काय'चा आवाज तयार केला अशी विचारणा कंपनीकडे करण्यात आली. त्यानंतर कंपनीने नाखुषीने तिच्यासारखा वाटणारा आवाज मागे घेण्याची तयारी दाखवली. त्यानंतर आता 'स्काय'चा आवाज 'ज्युनिपर'सोबत बदलण्यात आला आहे.

Scarlett Johansson sam altman
Sam Altman Marriage : 'एआय' किंग सॅम अल्टमन विवाहबंधनात; बेस्ट फ्रेंडसोबत केलं लग्न! फोटो व्हायरल

स्कार्लेटने एआय आणि डीफेक बाबात भाष्य केलं आहे. आपण सध्या डीपफेकसंबंधी सुरक्षेच्या अभावाला सामोरे जात आहोत. आपली ओळख, आपलं काम यावर याचा परिणाम होणार असल्याने आपल्या सर्व प्रश्नांची स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे उत्तरं मिळाली पाहिजेत. प्रत्येकाच्या व्यक्तिगत हक्कांचे संरक्षण व्हावी यासाठी प्रयत्न करुया, असं ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com