piyush goyal
sakal
रॉटरडॅम (नेदरलॅंड्स) - युरोपच्या व्यापार आणि ऊर्जा व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या रॉटरडॅम बंदराने आता पारंपरिक मालवाहतुकीपलीकडे हरित ऊर्जा आणि हायड्रोजनच्या केंद्राकडे वाटचाल सुरू केली आहे.
भारताचे वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज या बंदराला भेट देऊन आधुनिक लॉजिस्टिक्स, ऊर्जा संक्रमण आणि भविष्यातील बंदर व्यवस्थेचा आढावा घेतला. भारताची बंदर क्षमता पुढील दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे उद्दिष्ट असून, रॉटरडॅमसोबत सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे गोयल यांनी सांगितले.