ब्रिटनच्या राजघराण्यात होणार शाही बाळाचे आगमन

वृत्तसंस्था
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

ब्रिटनच्या शाही घराण्याची सून म्हणजेच 'डचेस ऑफ ससेक्स' मेगन मार्कल लवकरच आई होणार आहे. केनिंग्सटन पॅलेसकडून ही माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.

ब्रिटनच्या शाही घराण्याची सून म्हणजेच 'डचेस ऑफ ससेक्स' मेगन मार्कल लवकरच आई होणार आहे. केनिंग्सटन पॅलेसकडून ही माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे. याच वर्षी मे महिन्यात प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. 

या गोड बातमीमुळे लवकरच नव्या पाहुण्याचे शाही घरात आगमन होणार आहे. याची माहिती केनिंग्सटन पॅलेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आली आहे. येत्या वसंत ऋतूत राजघराणे बाळाचे स्वागत करेल अशी माहिती या ट्विटमधून देण्यात आली आहे. 2016 मध्ये मेगन आणि प्रिन्स हॅरीच्या प्रेमसंबंधांला सुरवात झाली व 2018 मध्ये ते विवाहबद्ध झाले. सर्व शाही परिवार नव्या बाळाची वाट पाहात आहे. सध्या हे शाही जोडपे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. विवाहानंतर मेगनने अभिनयाकडे पाठ फिरवली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Royal Highnesses The Duke and Duchess of Sussex meghan markle expecting a baby