जगाचा भारतावर विश्वास, आपल्यावर नाही; पाक मंत्र्याची कबुली

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्द्यावरून पाठिंबा मिळविण्यात अपयशी ठरले. इम्रान खान यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी पाकिस्तानची छबी खराब करून ठेवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. काश्मीरमधील नागरिकांना जीवनाश्यक वस्तू पुरवायच्या आहेत, असे आम्ही सांगितले तरी कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.

इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्द्यावरून जगाचा भारतावर विश्वास आहे, आपल्यावर नाही अशी कबुली पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री ब्रिगेडियर इजाझ अहमद शाह यांनी दिली आहे.

इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताशी व्यापारसंबंध तोडले आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून पाकिस्तानचा थयथयाट होत आहे. पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. मात्र, कोणत्याही देशाने त्यांना पाठिंबा न देता हा दोन्ही देशांचा प्रश्न आहे असे सांगितले. तसेच काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही ठणकावले. आता यावर त्यांच्याच मंत्र्याने कबुली दिल्याने इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे.

इजाझ अहमद शाह म्हणाले, की पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्द्यावरून पाठिंबा मिळविण्यात अपयशी ठरले. इम्रान खान यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी पाकिस्तानची छबी खराब करून ठेवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. काश्मीरमधील नागरिकांना जीवनाश्यक वस्तू पुरवायच्या आहेत, असे आम्ही सांगितले तरी कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. सत्ताधारी पक्षाने देशाचे नाव उद्ध्वस्त केले. पाकिस्तानबाबत आता कोणच गांभीर्याने घेत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ruling elite destroyed Pakistans image internationally world trusts India says Pakistan interior minister