शिंझो आबेंच्या पक्षाचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ruling Liberal Democratic Party victory in Japan upper house of parliament  former Prime Minister Shinzo Abe

शिंझो आबेंच्या पक्षाचा विजय

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या जपानच्या संसदेच्या वरीष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने सहज बहुमत मिळविले. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी जपानचे पंतप्रधान फ्युमिओ किशिदा यांची भेट घेत आबे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. जपानच्या वरीष्ठ सभागृहाला फारसे अधिकार नसले तरी याच सभागृहातील सदस्यांच्या निवडणूकीसाठी शिंझो आबे हे प्रचार करत असताना त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आबे यांच्या निधनाबरोबरच ही निवडणूकही चर्चेत आली होती. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षालाच (एलडीपी) विजय मिळण्यासारखी परिस्थिती असली तरी आबे यांच्या हत्येमुळे या पक्षाच्या बाजूने सहानुभूतीची लाटही निर्माण झाली होती.

त्यामुळे मतदानही तीन टक्क्यांनी अधिक झाले होते. या निवडणुकीत ‘एलडीपी’ला २४८ पैकी १४६ जागा मिळाल्या. यामुळे किशिदा यांचा २०२५ पर्यंत पंतप्रधान पदावर राहण्याचा मार्ग निर्धोक झाला आहे. पक्षाच्या विजयापेक्षाही या निवडणुकीत हिंसाचाराचा सामना करत लोकशाहीचा विजय झाला, ते अधिक मोलाचे आहे, अशी प्रतिक्रिया किशिदा यांनी व्यक्त केली. दरम्यान, ब्लिंकन यांनी पंतप्रधान किशिदा यांची भेट घेत आबे यांच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त केले. ‘जपान आणि अमेरिका यांच्यात भागीदारीपेक्षाही मैत्रीचे संबंध अधिक आहेत. त्यामुळे आबे यांचा मृत्यू ही अमेरिकेचीही वैयक्तिक हानी आहे,’ असे ब्लिंकन यांनी सांगितले.

Web Title: Ruling Liberal Democratic Party Victory In Japan Upper House Of Parliament Former Prime Minister Shinzo Abe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..