Rupert Murdoch: सात दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर रुपर्ट मर्डोक 'फॉक्स' च्या अध्यक्षपदावरुन पायउतार

Rupert Murdoch
Rupert Murdoch

वॉशिंग्टन- रुपर्ट मर्डोक (Rupert Murdoch) यांनी गुरुवारी फॉक्स कॉर्पोरेशन आणि फॉक्स न्यूजच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याचे जाहीर केले. माध्यम क्षेत्रात सात दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत न्यूज आणि मनोरंजन विश्वात स्वत:चे साम्राज्य निर्माण करणारे मर्डोक यांनी अखेर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. द वॉल स्ट्रिट जनरलने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

माझ्या संपूर्ण प्रोफेशनल जीवनात मी दररोज बातम्या आणि संकल्पनांमध्ये गुंतलेला होतो. आणि यापुढेही ते बदलणार नाही, असं रुपर्ट मर्डोक कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणाले आहेत. पण, सध्या वेगळी भूमिका घेण्याची योग्य वेळ आली आहे. सध्या आपल्याकडे बुद्धीमान आणि कौशल्यपूर्ण टीम आहे. त्यामुळे कंपनीचे भविष्य उज्वल आहे, असंही ते म्हणाले.

Rupert Murdoch
India-Canada Tension:भारतीय हिंदुंनो कॅनडा सोडून निघून जा; कॅनडातील SFJ च्या फुटीरतावाद्याने काढले फर्मान

रुपर्ट मर्डोक (वय ९२) यांच्यानंतर त्यांचे पुत्र लचलान मर्डोक हे फॉक्स कॉर्पोरेशन आणि फॉक्स न्यूजचे अध्यक्ष असतील. खूप जास्त अभिमान आणि खोटी नम्रता हे दोन्ही चांगले गुण नाहीत. पण, गेल्या काही दशकांमध्ये आपण जे काही मिळवलंय ते अभिमानास्पद आहे. मी माझ्या सहकार्यांचा खूप ऋणी आहे. त्यांचे योगदान कंपनीच्या बाहेर ओळखलं जात नसेल, पण मी त्यांचा खूप आभारी आहे, असं मर्डोक म्हणाले.

Rupert Murdoch
India-Canada row: कॅनडा दहशतवादी-कट्टरतावाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान; भारताकडून जस्टिन ट्रूडो यांच्यावर हल्लाबोल

फॉक्सची सुरुवात

मर्डोक यांनी १९९६ मध्ये फॉक्स न्यूजची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांनी प्रस्थापित सीएनएनला टक्कर दिली होती. काही वर्षांमध्येच त्यांनी सीएनएनला मागे टाकत अमेरिकेतील एक क्रमांकाचे न्यूज केबल चॅनल म्हणून मान मिळवला होता.

फॉर्ब्सनुसार, मर्डोक यांची संपत्ती १७ अब्ज डॉलर इतकी आहे. त्यांच्या मालकीमध्ये फॉक्स न्यूज, द वॉल स्ट्रिट जनरल, द न्यू यॉर्क पोस्ट याचा समावेश होता. तसेच जगभरातील अनेक माध्यम संस्थांमध्येही त्यांनी हातपाय पसरले आहेत. मर्डोक यांना एकूण सहा मुलं आहेत. त्यांनी एकूण तीन लग्न केली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com