बायकोला इम्प्रेस करण्यासाठी त्याने काय केले हे पाहून तुम्हाला बसेल धक्का!

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

34 वर्षीय इवान सॅनिनने 218 टन वजनी रेल्वे ओढून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. रशियात ह्यूमन माउंटेन नावाने चर्चित असणाऱ्या इवानने व्लादिवोस्तॉक शहरात हा पराक्रम गावजला.

रशिया : बायकोला इम्प्रेस करण्यासाठी जगात काहीही केले जाते हे ऐकले आहे. परंतू एका व्यक्तीने चक्क आपल्या बायकोला खुश करण्यासाठी रेल्वे ओढली आहे. ही घटना रशिया येथे घडली आहे. 

दरम्यान, येथील 34 वर्षीय इवान सॅनिनने 218 टन वजनी रेल्वे ओढून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. रशियात ह्यूमन माउंटेन नावाने चर्चित असणाऱ्या इवानने व्लादिवोस्तॉक शहरात हा पराक्रम गावजला. हे लक्ष्य गाठण्यासाठी मागील एक वर्षापासून तो तयारी करत असल्याचे इवानने सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी मलेशियातील क्वालालंपूर रेल्वे स्थानकावर 18 ऑक्टोबर 2003 रोजी वेलु रथकृष्णनने आपल्या दातांनी 260.8 टन वजनी केटीएम रेल्वेला 4.2 मीटर (13 फूट 9 इंच)पर्यंत ओढण्याचा जागतिक विक्रम बनवला होता. तर भारतातील मध्यप्रदेशच्या विदिशा येथील रहिवासी ब्रह्मचारी आशीषने आपल्या दातांना 65 टन वजनी रेल्वे इंजिन ओढले आहे. याशिवाय ग्वालियरच्या आरती आणि सविताने नॅरोगेज रेल्वेचे इंजिन ओढून लिम्का बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

माझ्याविरोधात महाभियोग हा लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा डाव : ट्रम्प 

दरम्यान, इवाने ही रेल्वे आपल्या पत्नीला प्रभाविक करण्यासाठी खेचली. आता त्याचे पुढील लक्ष्य 12 हजार टन वजनी जहाज ओढण्याचे आहे. रशियन मीडियानुसार, जगात यापूर्वीही रेल्वे इंजिन, जहाज आणि विमानाला खेचले आहे, परंतु स्नायूंच्या सामर्थ्याने इतक्या वजनाची रेल्वे खेचण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia 218 ton train pulling world record to impress wife