6 तास युद्ध थांबणार असल्याचं वृत्त फेक; परराष्ट्र मंत्रायलानं केलं स्पष्ट| Ukraine Russia War | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arindam Bagchi

6 तास युद्ध थांबणार असल्याचं वृत्त फेक; परराष्ट्र मंत्रायलानं केलं स्पष्ट

Ukraine Russia War : युक्रेनच्या खारकिव्हमधून आसपासच्या देशांच्या सीमेवर अडकलेल्या भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी रशियाने 6 तास हल्ले थांबवल्याच्या बातम्या खोट्या आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुखरुप सुटकेसाठी रशिया युक्रेनमधील हल्ले सहा तासांसाठी थांबवणार असल्याच्या बातम्या समोर अल्या होत्या. मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाकडून असे काही घडले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Indian Student IN Ukraine )

हेही वाचा: सरकारी कार्यालयांमध्ये नावापुढे 'राजा','राजकुमार' वापरता येणार नाही : राजस्थान HC

रशिया-युक्रेन या दोन देशांमध्ये युद्धाचा आजचा आठवा दिवस असून, अद्यापही हे युद्ध थांबवण्यात कोणत्याही देशाला यश आलेले नाही. दरम्यान, युक्रेनमध्ये आडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडवण्यासाठी भारत सरकारकडून आवश्यक ती सर्व पाऊले उचलली जात असून, ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत अनेक भारतीय विद्यार्थांना मायदेशात परत आणण्यात आले आहे.

आजही युक्रेनमध्ये हजारो विद्यार्थी अडकून असून त्यांच्या सुखरुप सुटकेसाठी रशियाने सहा तास हल्ले थांबवणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, असे काही घडले नसल्याचे स्पष्टीकरण भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिले आहे. बुधवारी रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली त्यावेळी मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त केली.

Web Title: Russia Agree To Stop War For 6 Hours In Kharkiv For Indian Student

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..