रोहिंग्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी रशिया, भारताने पुढाकार घ्यावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 मे 2018

ढाका : रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी चीन, रशिया, भारत आणि जपान महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी अपेक्षा बांगलादेशने आज व्यक्त केली आहे.

ढाका : रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी चीन, रशिया, भारत आणि जपान महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी अपेक्षा बांगलादेशने आज व्यक्त केली आहे.

रोहिंग्या निर्वासितांच्या मुद्‌द्‌यावर पंतप्रधान शेख हसिना आणि संयुक्त राष्ट्र परिषदेच्या शिष्टमंडळांची सरकारी निवासस्थानी गनोभाबन येथे चर्चा झाली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष गुस्ताव मेझा क्वाड्रा करत आहेत. म्यानमारमधून हजारोच्या संख्येने बांगलादेशात आलेल्या रोहिंग्यांचा पुनर्वसनाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, म्यानमारने त्यांना परत बोलवावे, असे आवाहन शेख हसिना यांनी या वेळी केले. बांगलादेशच्या भूमिकेला जागतिक संघटनेने पाठिंबा द्यावा. म्यानमारवर जागतिक दबाव आणावा असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

रोहिंग्यांच्या मुद्‌द्‌यावरून बांगलादेशला कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. शांततेच्या मार्गाने या प्रश्‍नाचा निकाल लागावा, अशी अपेक्षा त्यांनी केली. यासंदर्भात चीन, भारत, थायलंड आणि लाओसशी चर्चा झाल्याचे सांगून रोहिंग्याचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली मिटावा. आमच्या बाजूने संपूर्ण सहकार्य करण्याची तयारीही असल्याचे त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia, India should take the initiative to solve the question of Rohingya