‘पाशवी शक्ती’ची जगावर सत्ता नको - वोलोडिमिर झेलेन्स्की

झेलेन्स्की यांचे जगाला आवाहन; जागतिक आर्थिक मंचावर भाषण
Russia invading Ukraine Volodymyr Zelenskyy World Economic Forum restriction on russia
Russia invading Ukraine Volodymyr Zelenskyy World Economic Forum restriction on russia sakal

दावोस/किव्ह : युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियावर जास्तीत जास्त निर्बंध जारी करावेत, अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी जागतिक आर्थिक मंचाच्या व्यासपीठावरून सर्व जगाला केली. तसेच, ‘पाशवी शक्ती’ची जगावर सत्ता येऊ द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले. झेलेन्स्की यांनी आज स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरु झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत व्हिडिओ लिंकद्वारे सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले की,‘‘रशियाच्या सर्व बँकांवर निर्बंध घालावेत, त्यांच्याकडून इंधन आयात करणे पूर्णपणे बंद करावे आणि इतर सर्व व्यापार बंद करावा.

जगात मूल्यांचे संरक्षण व्हायलाच हवे. पाशवी शक्तीला पराभूत करण्याची वेळ आली आहे.’’ युद्धानंतर युक्रेनमध्ये पुनर्बांधणी करण्यासाठी आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक मोठ्या संधी असल्याचेही झेलेन्स्की यांनी या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या देशांना सांगितले. डेन्मार्क आणि युरोपीय महासंघाने यासाठी पुढाकार घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली.

रशियन युद्धकैद्याला जन्मठेप

किव्ह : सामान्य नागरिकाची हत्या करणाऱ्या रशियाच्या एका सैनिकाला युक्रेनमधील न्यायालयाने युद्धगुन्ह्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनमध्ये आक्रमण केल्यापासून प्रथमच युद्धगन्ह्याबाबत सुनावणी होऊन शिक्षाही दिली गेली आहे. सार्जंट व्हादीम शिशीमरीन असे या सैनिकाचे नाव असून त्याने २८ फेब्रुवारीला युक्रेनमधील एका गावातील ज्येष्ठ नागरिकाला अकारण गोळ्या मारल्या होत्या. त्याला युक्रेनच्या सैनिकांनी पकडले होते. व्हादीमने गुन्हा मान्य केला, मात्र आपण हे वरीष्ठांच्या आदेशानुसार केले होते, असा दावाही त्याने केला होता.

युद्ध समर्थकांची संपत्ती जप्त

युक्रेनच्या संसदेने आज नवा कायदा संमत करत रशियाच्या आक्रमणाचे समर्थन करणाऱ्यांना दणका दिला आहे. अशा समर्थकांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार संसदेने सरकारला दिले आहेत. त्यामुळे याआधी आणि यानंतरही रशियाचे समर्थन करत त्यांना मदत करत असल्याचे आढळल्यास त्या व्यक्तीची संपत्ती सरकारी तिजोरीत जमा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com