रशियाचा पराभव होतोय; अँटनी ब्लिंकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

US Secretary Antony Blinken
रशियाचा पराभव होतोय; अँटनी ब्लिंकन

रशियाचा पराभव होतोय; अँटनी ब्लिंकन

किव्ह : रशियाने युक्रेनच्या पूर्व भागात हल्ल्यांची तीव्रता वाढविली असतानाच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी काल (ता. २४) राजधानी किव्ह येथे गोपनीयरित्या भेट दिली. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की हे या युद्धात आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून यासाठी अमेरिका त्यांना मदत करेल, असे आश्‍वासन ब्लिंकन यांनी या दौऱ्यावेळी दिले. या युद्धात रशियाचा पराभव होत आहे, असा दावाही त्यांनी केला.

ब्लिंकन आणि ऑस्टिन यांनी काल झेलेन्स्की यांची भेट घेत युद्धस्थितीचा आढावा घेतला. यानंतर दोन्ही नेत्यांनी पोलंडला जात पत्रकार परिषद घेतली. ‘युद्ध सुरु होऊन दोन महिने झाले तरी रशियाला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. या युद्धात विजय मिळवूच, अशी झेलेन्स्की यांची मानसिकता असून त्यांना मदत करण्याची अमेरिकेची इच्छा आहे,’ असे ऑस्टिन यांनी सांगितले. अमेरिकेने युक्रेनला १६.५ कोटी डॉलरची शस्त्रे विकण्याचा आणि ३० कोटी डॉलर लष्करी मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. ब्लिंकन म्हणाले की, रशियाला एकटे पाडण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊले उचलत आहोत.

Web Title: Russia Is Losing Us Secretary Anthony Blinken And Secretary Of Defense Lloyd Austin Secret Visit To Capital Kyiv Volodymyr Zelensky

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top