Japan tsunami 2025 photos videos : बुधवारी रशियाच्या सुदूर पूर्वेतील कमचटका द्वीपकल्पात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून या भागातील इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीसुद्धा आली आहे. तसेच इतर चार देशांनाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.