
नवी दिल्लीः 30 जुलै 2025 रोजी रशियाच्या दुर्गम कामचटका द्वीपकल्पात 8.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की, त्याची गणना इतिहासातील सहाव्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या भूकंपात होते. हा भूकंप रशियाच्या नौदलाच्या महत्त्वाच्या अण्वस्त्र पाणबुडी तळापासून केवळ 120 किलोमीटर अंतरावर झाला. या घटनेमुळे रशियाच्या अण्वस्त्रांची आणि पाणबुड्यांची सुरक्षा धोक्यात आल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.