
थोडक्यात :
रशियाच्या कामचटकामध्ये ८.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंप समुद्राखाली झाला, ज्यामुळे जपानपासून कॅलिफोर्नियापर्यंत त्सुनामीचा इशारा जारी झाला आहे.
जपानच्या किनारपट्टीवर १ मीटर उंचीच्या त्सुनामी लाटांचा धोका, सरकारने आपत्कालीन बैठक घेऊन तयारी सुरू केली आहे.
रशियामध्ये यापूर्वीही भूकंप झाले असून, २० जुलै २०२५ रोजी कामचटकामध्ये ७.४ आणि ६.७ तीव्रतेचे भूकंप झाले होते.
रशियातील कामचटकामध्ये बुधवारी (३० जुलै) तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता ८.७ रिश्टर स्केल इतकी आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंप समुद्राखाली झाला होता, त्यानंतर त्सुनामीचा धोकाही आहे. अमेरिका आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. सध्या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही.