Russia Lab Technician Death
esakal
रशियाच्या सायबेरिया भागातील एका लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने सध्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. इरकुत्स्क भागातील अँटी-प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या २८ वर्षीय दर्या शिपिलोवा यांना गंभीर न्यूमोनिया झाला होता. उपचारादरम्यान २ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या मृत्यूमागे प्लेग, विशेषतः न्यूमोनिक प्लेग तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली.