
किव्ह : रशियाने युक्रेनची राजधानी किव्हसह अन्य अनेक शहरांत शनिवारी रात्री ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. रशियाने २९८ ड्रोन आणि ६९ क्षेपणास्त्रे युक्रेनवर डागली असून, मागील तीन वर्षांत युक्रेनवर करण्यात आलेला हा आतापर्यंत सर्वांत मोठा हल्ला आहे, असा दावा युक्रेनच्या हवाई दलाचे प्रवक्ते युरी इन्हात यांनी केला आहे. दरम्यान, रशियाने मात्र या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत दिलेली नाही.