Russia On Meta: रशियन सरकारकडून 'मेटा' दहशतवादी संघटना घोषित, केले गंभीर आरोप

russia lists meta facebook parent company terrorist organization
russia lists meta facebook parent company terrorist organization

जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी मेटाला रशियाने दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना म्हणून घोषित केले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आणि सांगितले की, सोशल मीडियावर युक्रेनला मिळत असलेल्या समर्थनामुळे रशिया नाराज आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्षाच्या सुरुवातीला युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यानंतर मार्चमध्ये, रशियाच्या सरकारने आपल्या नागरिकांसाठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लॉक केले.आता मॉस्को कोर्टाने मार्क झुकरबर्गची कंपनी मेटा कट्टरपंथी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला आहे.

रशियाचे मेटावर गंभीर आरोप

मॉस्कोच्या एका न्यायालयाने म्हटले आहे की मेटाचे प्लॅटफॉर्म सोशल मीडिया वापरकर्त्यांना रशियन लोकांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा कंटेट शेअर करण्याची परवानगी देत ​​​​आहे. तसेच मेटा ही कंपनी युक्रेनमध्ये भावना भडकावण्याचे काम करत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.

russia lists meta facebook parent company terrorist organization
Amazon Sale: OnePlus 10R फोनवर मिळतेय बंपर सूट! जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

मेटा यांनी आरोप फेटाळले

सोशल मीडिया कंपनी मेटाच्या वकिलाने हे आरोप फेटाळून आले आहे आणि न्यायालयाला सांगितले की त्यांची कंपनी कधीही कोणत्याही कट्टरपंथी कारवायांचा भाग नाही. वकिलाने सांगितले की, रशियाविरुद्ध द्वेष किंवा भीती पसरवणाऱ्यांना META चे समर्थन कधीच मिळालेले नाही.

russia lists meta facebook parent company terrorist organization
Shivsena: 'ढाल-तलवार' चिन्हाचा इतिहास! आधीचा अख्खा पक्षच झाला होता काँग्रेसमध्ये विलीन

रशियाकडून सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा

युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युक्रेनला मोठा पाठिंबा होता.यामुळेच रशियाने या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. यानंतर सोशल प्लॅटफॉर्म्सनी रशियन सरकारने प्रायोजित केलेल्या पोस्ट आणि मीडिया ब्लॉक करण्यास सुरुवात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com